सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर पडलो. शक्यतो अश्या वेळी मी माझ्या धुंदीत असतो. समोरून कुणी ओळखीचे गेले तरी लक्ष नसतं. मी माझ्याच विचारात मग्न असतो. अर्थात मगाशी मी अश्या वेळी म्हटलं तरी "अशी वेळ" कायमच असते. मी कुठल्याही वेळी विचारांच्या तंद्रीतच असतो (आणि त्यामुळे अनेक घोटाळे पण होत राहतात.) पण त्याबद्दल नंतर, आज काय घडलं ते विशेष. स्टेशनला पोहोचलो तर एकाच्या बंदुकीची नळीचं टोक बॅगेच्या साईड पॉकेटच्या फाटलेल्या जाळीत अडकलं.
हो तुम्ही बरोबर वाचलंत. ती बंदुकीची नळीच होती. या वेळी कोण लवाजमा घेऊन चाललंय पहावं तर.. मी ढम्म थांबलो. मला लक्षात आलं की ही परिस्थिती माझीच नाही तर रस्त्यातल्या गर्दीतल्या प्रत्येक अणू रेणूची आहे. साक्षात... हो साक्षात सचिन..
(आता "कोण सचिन?" असे विचारल्यास पुण्यापेक्षाही भयंकर अपमान करण्यात येईल.) मी सचिन तेंडुलकर बद्दलच बोलतोय.
तर साक्षात आपल्या सचिनला पाहून डोळे भरून आले, ओठांवर एक सुंदर स्मित आले, उर अभिमानाने भरून आला. इतकं सगळं तर कॉलेजमधल्या सॅनोरीटाला बघून पण होत नव्हतं. (तिच्याबद्दलच्या पुढील प्रश्नांसाठी थेट संपर्क करावा.) मी ताबडतोब बॅगेतलं सचिनचं खास बनवून घेतलेलं टी शर्ट काढलं. मागच्या वेळी असाच अचानक सचिन भेटला तेव्हा टी शर्ट नव्हतं याची चुटपुट लागली होती. तेव्हापासून कायम ते बॅगेत घेऊन फिरतो. आज ते कामात आलं. २४ वर्षे सचिनच्या अचूक टायमिंगचं कौतुक करणाऱ्या लोकांनी आज माझ्या टायमिंगचं कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवल्या. अपेक्षित परिणाम साधला गेला. सचिनचं लक्ष माझ्याकडे गेलं. मागच्या भेटीत हात मिळवला होता पण फोटो आणि स्वाक्षरी राहूनच गेले होते. आज काहीही करून या टी शर्टवर सचिनची स्वाक्षरी घ्यायचीच असा मी पण केला. फासे पण माझ्या बाजूनेच पडत होते. त्याच्या स्ट्रेट ड्राइव्ह सारखंच एक चित्तवेधक हास्य करत मला त्याने सुरक्षा कवचात यायची परवानगी दिली. "वूsss" च्या गजरात जमावाने माझं अभिनंदन केलं. जवळ जाताच मी आधी सचिनचा हात हातात घेतला. मागच्या वेळी विमानतळावर भेट झाल्याचं सांगितलं. त्याच्या नम्र स्वभावानुसार त्याने ते आठवल्याचंही सांगितलं. मग आम्ही त्याच्या मोबाईलमध्ये एक सेल्फी घेतला. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, शर्ट वर सचिनची स्वाक्षरी घेणं.
एव्हाना गर्दी वाढू लागली. ट्रॅफिक पोलीस पण आले. माझ्याकडे तर त्यांनी इतक्या आदराने पाहिलं की वाटलं आता पुढच्या क्षणी "याच्या नावाने पुढची १० वर्षे पावती फाडायची नाही" असं लिहून देतील. पण गर्दी वाढल्याने सचिनसकट सर्वांचाच नाईलाज होत होता.
मी आता शर्ट काढण्याच्या तयारीत होतो. पण शर्ट ४ वर्ष जुना. मधल्या काळात अनेक पापलेट, सूरमई आणि चिकन तंदुरींनी माझ्या तब्येतीला हातभार (पोटभार) लावला होता. शर्ट निघता निघेना.. मगासाच्या बंदुकवाल्या राक्षकाला सांगितलं की मला मदत करु तर माझा हात पकडून मला म्हणाला..
..

...
....
"अहो, उठा, आठ वाजता उठवायला सांगितलं होतं ना तुम्ही.." खळ्ळ खट्याक..!!
नवरा स्वप्नात पण आनंदी असलेला पाहवत नाही या बायकांना..
असो एका स्वप्नात फक्त दिसला, एकात हात मिळवला, आज सेल्फी पर्यंत मजल मारली. स्वाक्षरी पण मिळेलच कधीतरी.
पण लाखो लोकांना पडत नाही असं सुंदर स्वप्न मला पडलं या आनंदात दिवस छान जाईल.

- चंदन तहसीलदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा